सतीशने अकलेचे ’तारे’ तोडले,
मोहनही ’जोशी’ला आहे.
मराठी नाटकांचा तमाशाच
आजकाल नशीला आहे.
एकच प्याल्याचा मोह न पड्तो तर
पुढचा तमाशा घडला नसता !
अध्यक्षपदाचा अबलख घोडा
देशोदेशी उडला असता !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
1 comment:
डोळस साहेब,
म-स-त.......:)
मुळात नाटकाच्या चौथ्या अंकाला कोणाचीच हरकत नसते नि पूर्वीही नव्हती,फक्त त्यास प्रेक्षक नसावे हि कलाकारांनी घ्यावयाची दक्षता असते.मोहनराव नि इतर फारच "तारे" त गेल्या मुळे नि त्यांची नेमकी मोठी खुर्ची आडवी आल्याने सगळा गोंधळ झालाय.पण ह्या लोकांच्या एक गोष्ट नेहमी पथ्यावर पडते नि ती म्हणजे "पब्लिक मेमरी",कि जी नेहमी "शॉर्ट" असते.
Post a Comment