Saturday, May 7, 2011

मोहन जोशी (ला)

सतीशने अकलेचे ’तारे’ तोडले,
मोहनही ’जोशी’ला आहे.
मराठी नाटकांचा तमाशाच
आजकाल नशीला आहे.

एकच प्याल्याचा मोह न पड्तो तर
पुढचा तमाशा घडला नसता !
अध्यक्षपदाचा अबलख घोडा
देशोदेशी उडला असता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

mynac said...

डोळस साहेब,
म-स-त.......:)
मुळात नाटकाच्या चौथ्या अंकाला कोणाचीच हरकत नसते नि पूर्वीही नव्हती,फक्त त्यास प्रेक्षक नसावे हि कलाकारांनी घ्यावयाची दक्षता असते.मोहनराव नि इतर फारच "तारे" त गेल्या मुळे नि त्यांची नेमकी मोठी खुर्ची आडवी आल्याने सगळा गोंधळ झालाय.पण ह्या लोकांच्या एक गोष्ट नेहमी पथ्यावर पडते नि ती म्हणजे "पब्लिक मेमरी",कि जी नेहमी "शॉर्ट" असते.

अतृप्त आत्मे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- अतृप्त आत्मे विधानसभेचे अतृप्त आत्मे, लोकसभेत जागे होऊ लागले. जमेल त्या झाडाला, जमेल तसे झटे देऊ ल...