कितीही राग आला तरी
राग गिळावा वाटतो.
प्रत्येक राजकीय पक्ष म्हणजे
सर्वपक्षीय मेळावा वाटतो.
काल वेगळय़ा, परवा वेगळय़ा,
आज वेगळय़ा पक्षात आहेत!
सर्वपक्षीय भ्रमण करून आलेले
आज निष्ठावंतांच्या कक्षात आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 30, 2011
Monday, September 26, 2011
अशीही खपवा'खप'वी
ज्याच्या समोर बॉलिंग करताना
शेन वॉर्नही गडबडला.
तो मला घाबरत होता
शोएब अख्तर बडबडला.
सचिन म्हणजे सचिन,
सचिन म्हणजे फौलाद आहे!
चेंडू कुडतरल्याची कबुली देणारा
शोएब उंदराची औलाद आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
शेन वॉर्नही गडबडला.
तो मला घाबरत होता
शोएब अख्तर बडबडला.
सचिन म्हणजे सचिन,
सचिन म्हणजे फौलाद आहे!
चेंडू कुडतरल्याची कबुली देणारा
शोएब उंदराची औलाद आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 23, 2011
आमचे शपथपत्र
त्यांनी रोजच्या जगण्याचे नियोजन
26 रुपयांत करून दाखवावे.
जगणेच काय पण,
32 रुपयांत मरून दाखवावे.
त्यांनाही श्रीमंत म्हणू लागले
ज्यांचे दारिद्रय़ाशी सख्य आहे!
जेवढय़ात मरणे शक्य नाही
तेवढय़ात जगणे कसे शक्य आहे?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
26 रुपयांत करून दाखवावे.
जगणेच काय पण,
32 रुपयांत मरून दाखवावे.
त्यांनाही श्रीमंत म्हणू लागले
ज्यांचे दारिद्रय़ाशी सख्य आहे!
जेवढय़ात मरणे शक्य नाही
तेवढय़ात जगणे कसे शक्य आहे?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, September 22, 2011
भाद्रपद दर्शन
चित्रपट आणि टीव्ही
म्हणे समाजाचा ऐना असतो.
म्हणून बाराही महिने पडद्यावर
भाद्रपदाचाच महिना असतो.
कुत्र्यासारखे त्यांचे शेपूट
वाकडे ते वाकडे असते
रस्त्यावरचे 'भाद्रपद दर्शन'सुद्ध
त्याच्यापेक्षाही तोकडे असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
म्हणे समाजाचा ऐना असतो.
म्हणून बाराही महिने पडद्यावर
भाद्रपदाचाच महिना असतो.
कुत्र्यासारखे त्यांचे शेपूट
वाकडे ते वाकडे असते
रस्त्यावरचे 'भाद्रपद दर्शन'सुद्ध
त्याच्यापेक्षाही तोकडे असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, September 21, 2011
प्रेमाला उपमा आहे
कालचे ठाकरी बंधुप्रेम
आज खड्डय़ात घातले आहे.
आपल्या भाऊबंदकीमध्ये
त्यांनी जनावरांनाही घेतले आहे.
तेच सांगायला लागले
कोण पाळीव? कोण जंगली आहे?
एवढय़ा मोठय़ा घराण्याची इज्जत
मुंबईच्या वेशीवर टांगली आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आज खड्डय़ात घातले आहे.
आपल्या भाऊबंदकीमध्ये
त्यांनी जनावरांनाही घेतले आहे.
तेच सांगायला लागले
कोण पाळीव? कोण जंगली आहे?
एवढय़ा मोठय़ा घराण्याची इज्जत
मुंबईच्या वेशीवर टांगली आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, September 20, 2011
उपोषण लाईव्ह
'सर्वात आधी, सर्वात प्रथम'
आपले ध्येय टिकवले गेले.
जेवढे अण्णांचे दाखवले,
तेवढेच मोदींचे दाखवले गेले.
उपोषण कुणाचेही असो,
त्याच्याशी काही देणेघेणे नाही
टीआरपीच्या 24 ताशी जगात
एवढेही लक्षात येणे नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आपले ध्येय टिकवले गेले.
जेवढे अण्णांचे दाखवले,
तेवढेच मोदींचे दाखवले गेले.
उपोषण कुणाचेही असो,
त्याच्याशी काही देणेघेणे नाही
टीआरपीच्या 24 ताशी जगात
एवढेही लक्षात येणे नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, September 18, 2011
उपोषण युद्ध
विकासाच्या गप्पा मारल्या की वाटते
तो तर फुगीर दवणा आहे.
उपोषणाने कलंक धुतला जाईल
अशी त्यांची सदभावना आहे.
उपोषणाने चित्त शुद्ध होते
हे सत्य तर प्रयोगसिद्ध आहे!
आजकाल मात्र सगळीकडे
उपोषणाचे जाहीर युद्ध आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तो तर फुगीर दवणा आहे.
उपोषणाने कलंक धुतला जाईल
अशी त्यांची सदभावना आहे.
उपोषणाने चित्त शुद्ध होते
हे सत्य तर प्रयोगसिद्ध आहे!
आजकाल मात्र सगळीकडे
उपोषणाचे जाहीर युद्ध आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, September 17, 2011
सगळेच बोगस!
बोगस पटसंख्येचा मुद्दा
ज्याच्या त्याच्या ओठावर आहे.
एकच विद्यार्थी
अनेक शाळांच्या पटावर आहे.
हे कुणालाच माहीत नाही
हेच मुळी आम्हाला पटत नाही!
म्हणूनच 'नांदेड पॅटर्न'चे
आम्हाला आश्चर्य वाटत नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ज्याच्या त्याच्या ओठावर आहे.
एकच विद्यार्थी
अनेक शाळांच्या पटावर आहे.
हे कुणालाच माहीत नाही
हेच मुळी आम्हाला पटत नाही!
म्हणूनच 'नांदेड पॅटर्न'चे
आम्हाला आश्चर्य वाटत नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 16, 2011
पेट्रोल दरवाढ
वाढत्या महागाईची
पंपा-पंपावर पावती आहे.
पेट्रोलची दरवाढ
सहा महिन्यात चौथी आहे
सरकारी नियंत्रण नसल्यामुळेच
पेट्रोल मोकाट सुटलेले आहे!
रुपयाला डॉलरने
जगजाहीर लुटलेले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
पंपा-पंपावर पावती आहे.
पेट्रोलची दरवाढ
सहा महिन्यात चौथी आहे
सरकारी नियंत्रण नसल्यामुळेच
पेट्रोल मोकाट सुटलेले आहे!
रुपयाला डॉलरने
जगजाहीर लुटलेले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, September 11, 2011
आणखी एक रथयात्रा
ज्याची भीती वाटत होती
त्याचाच आता खतरा आहे.
अण्णा हजारेंच्या मार्गावरून
अडवाणींची रथयात्रा आहे.
लालकृष्णांची रोखठोक घोषणा
कसलीही आड वाणी नाही!
संधीचा फायदा न उठवणारा
राजकारणात तरी कोणी नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
त्याचाच आता खतरा आहे.
अण्णा हजारेंच्या मार्गावरून
अडवाणींची रथयात्रा आहे.
लालकृष्णांची रोखठोक घोषणा
कसलीही आड वाणी नाही!
संधीचा फायदा न उठवणारा
राजकारणात तरी कोणी नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, September 10, 2011
लोकपालचा पोरखेळ
मुले लहान असली तरी
त्यांना सर्व गोष्टी कळत असतात.
'लोकपालs लोकपालs'चा खेळ
आजकाल मुले खेळत असतात.
एकाच्या तोंडावर चिकटपट्टी,
त्याचे हातपायही बांधलेले.
मी विचारले, ही काय धमाल आहे?
मुले एका सुरात उत्तरला,
काका, हा सरकारी लोकपाल आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
त्यांना सर्व गोष्टी कळत असतात.
'लोकपालs लोकपालs'चा खेळ
आजकाल मुले खेळत असतात.
एकाच्या तोंडावर चिकटपट्टी,
त्याचे हातपायही बांधलेले.
मी विचारले, ही काय धमाल आहे?
मुले एका सुरात उत्तरला,
काका, हा सरकारी लोकपाल आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 9, 2011
हाय अॅलर्ट
हाय अॅलर्ट
एकाही बॉम्बस्फोटाचा
नीट शोध लागत नाही.
'हाय अॅलर्ट' म्हणजे काय?
याचाही बोध लागत नाही.
भोगायचा तो वनवास
जनतेने भोगलेला असतो!
सुटकेचा नि:श्वास टाकेपर्यंत
पुन्हा 'हाय अॅलर्ट' लागलेला असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
एकाही बॉम्बस्फोटाचा
नीट शोध लागत नाही.
'हाय अॅलर्ट' म्हणजे काय?
याचाही बोध लागत नाही.
भोगायचा तो वनवास
जनतेने भोगलेला असतो!
सुटकेचा नि:श्वास टाकेपर्यंत
पुन्हा 'हाय अॅलर्ट' लागलेला असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, September 7, 2011
नोट फॉर वोट
मत गल्लीत विकले जाते,
मत दिल्लीत विकले जाते.
गल्लीत शेकडय़ावर तर
दिल्लीत कोटीवर टाकले जाते.
गल्लीतले विक्रेते किरकोळ,
दिल्लीतील विक्रेते घाऊक आहेत!
मताला दान म्हणणारे
व्यवहारी नाहीत, भावूक आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मत दिल्लीत विकले जाते.
गल्लीत शेकडय़ावर तर
दिल्लीत कोटीवर टाकले जाते.
गल्लीतले विक्रेते किरकोळ,
दिल्लीतील विक्रेते घाऊक आहेत!
मताला दान म्हणणारे
व्यवहारी नाहीत, भावूक आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, September 6, 2011
मतलबी गुरूत्व
हा विद्यार्थी माझा आहे,
तो विद्यार्थी माझा आहे.
शिक्षकांच्या गप्पा ऐकण्यात
खरोखरच मजा आहे.
यशस्वी विद्यार्थी त्यांचे,
मग अयशस्वी कुणाचे असतात?
सोयीचे गुरूत्व दाखविणारे
विचार मतलबीपणाचे असतात !
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तो विद्यार्थी माझा आहे.
शिक्षकांच्या गप्पा ऐकण्यात
खरोखरच मजा आहे.
यशस्वी विद्यार्थी त्यांचे,
मग अयशस्वी कुणाचे असतात?
सोयीचे गुरूत्व दाखविणारे
विचार मतलबीपणाचे असतात !
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
'झेड' झिडकारू नका !
अण्णा दुसरे 'गांधी' आहेत तर,
इथे दुसरा नथुरामही असू शकतो.
याच्यावर तरी सर्वाचा विश्वास
अगदी ठामपणे बसू शकतो.
आपण 'राष्ट्रीय' झाल्याची गोष्ट
अण्णांच्या लक्षात यायला हवी!
स्वत:साठी नाही, राष्ट्रासाठी तरी
अण्णांनी झेड सुरक्षा घ्यायला हवी!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
इथे दुसरा नथुरामही असू शकतो.
याच्यावर तरी सर्वाचा विश्वास
अगदी ठामपणे बसू शकतो.
आपण 'राष्ट्रीय' झाल्याची गोष्ट
अण्णांच्या लक्षात यायला हवी!
स्वत:साठी नाही, राष्ट्रासाठी तरी
अण्णांनी झेड सुरक्षा घ्यायला हवी!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, September 5, 2011
पुरस्कार बोध
आदर्शाची निवड अशी की,
पुरस्कार मागायला लावतात.
कितीही नि:संशय झाले तरी
संशयाने बघायला लावतात.
आदर्श शिक्षक पुरस्कारांचा
वरचेवर विनोद होतो आहे!
खर्या आदर्शाचे हे काम नाही
दुर्दैवाने हाच बोध होतो आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, September 4, 2011
आदर्शाची आडवाट
नाकर्त्याला पुरस्कार,
कर्त्याला वनवास भोगावा लागतो.
आदर्श शिक्षक पुरस्कार
अक्षरश: मागावा लागतो.
आदर्श असून चालत नाही,
प्रामाणिकपणाही नडला जातो!
डाव-प्रतिडाव टाकले तरच
पुरस्कार पदरी पडला जातो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, September 3, 2011
शौचालय सक्ती
जे घरी बसत नव्हते
त्यांना घरी बसावे लागले.
ग्रामपंचायत सदस्यांना
नियमाचे फटके सोसावे लागले.
कळत असूनही वळत नाही
ही सामाजिक उणीव आहे!
ग्रा.पं. सदस्यत्व रद्द होणे
ही जबाबदारीची जाणीव आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
त्यांना घरी बसावे लागले.
ग्रामपंचायत सदस्यांना
नियमाचे फटके सोसावे लागले.
कळत असूनही वळत नाही
ही सामाजिक उणीव आहे!
ग्रा.पं. सदस्यत्व रद्द होणे
ही जबाबदारीची जाणीव आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 2, 2011
पक्षांतर आणि पेपरांतर
पत्रकारांनी पेपर बदलणे,
नेत्यांनी पक्ष बदलणे,
दोन्हीही गोष्टी सारख्या असतात.
फक्त पक्षांतरित नेत्यांच्याच
फिरक्यावर फिरक्या असतात.
प्रश्न निष्ठेचा नाही,
प्रश्न तर पापी पोटांचा आहे!
विचार-बिचार मानतो कोण?
सगळा मामला नोटांचा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, September 1, 2011
टोपीवर टोपी
तुही अण्णा मीही अण्णा
गणपती म्हणाला उंदराला.
गणपतीच्या पोटाकडे पाहून
पुन्हा हसू आले चंद्राला
आज प्रत्येकाच्याच डोक्यावर
'मी अण्णा हजारे' अशी टोपी आहे!
कृती अवघड असली तरी
करायला सोपी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...