Monday, April 9, 2012

अशी असावी वात्रटिका


वात्रटिकेत केवळ यमक नको,
वातट्रिकेत धमक पाहिजे.
मेंदूत प्रकाश पडावा
अशी  वात्रटिकेत चमक पाहिजे.

वात्रटिका भाकड नसावी,
वात्रटिका वांझोटी असू नये.
वात्रटिकेला विनोद समजून
कुणी निरर्थक हसू नये.

प्रत्येक शब्द म्हणजे
धक्क्यामागे धक्का पाहिजे!
हे ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही
वैचारिक पाया पक्का पाहिजे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...