Showing posts with label असली नकली. Show all posts
Showing posts with label असली नकली. Show all posts

Monday, March 15, 2021

असली नकली

आजची वात्रटिका
------------------
असली नकली
अस्सलची नक्कल करणे,
मोठी शक्कल वाटू लागते.
भेसळ एवढी बेमालूम की,
अस्सलही नक्कल वाटू लागते.
आदर्शांची नक्कल करताना,
प्रभाव टाळता आला पाहिजे !
अनुकरण आणि अनुसरण,
संकेत पाळता आला पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6088
दैनिक पुण्यनगरी
15मार्च2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...