Showing posts with label आजची वात्रटिकापाऊस करतो जीवाची मुंबई. Show all posts
Showing posts with label आजची वात्रटिकापाऊस करतो जीवाची मुंबई. Show all posts

Thursday, June 10, 2021

मुंबईचा पाऊस

आजची वात्रटिका
---------------------

मुंबईचा पाऊस

पाऊस जेंव्हा रंगात येतो,
तेंव्हा सारे मिठीत भरून घेतो.
पाऊस एवढा हौशी की,
तो जीवाची मुंबई करून घेतो.

पाऊस करतो जीवाची मुंबई,
पण मुंबईचा जीव खालीवर होतो !
यंत्रणेच्या फटीत पाणी सोडून,
पाऊस चोरावर मोर होतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-6172
दैनिक पुण्यनगरी
10जून2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...