Showing posts with label मुंबईचा पाऊस. Show all posts
Showing posts with label मुंबईचा पाऊस. Show all posts

Thursday, June 10, 2021

मुंबईचा पाऊस

आजची वात्रटिका
---------------------

मुंबईचा पाऊस

पाऊस जेंव्हा रंगात येतो,
तेंव्हा सारे मिठीत भरून घेतो.
पाऊस एवढा हौशी की,
तो जीवाची मुंबई करून घेतो.

पाऊस करतो जीवाची मुंबई,
पण मुंबईचा जीव खालीवर होतो !
यंत्रणेच्या फटीत पाणी सोडून,
पाऊस चोरावर मोर होतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-6172
दैनिक पुण्यनगरी
10जून2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...