Showing posts with label एकीच्या नावानं... Show all posts
Showing posts with label एकीच्या नावानं... Show all posts

Wednesday, February 25, 2026

एकीच्या नावानं.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
----------------------------
एकीच्या नावानं..
कुणाचीही आघाडी असो वा युती,
सत्तेच्या स्वार्थाचे प्रतिबिंब उमटले जाते.
जेव्हा जेव्हा कसोटीची वेळ येते,
तेव्हा तेव्हा आपलेच घोडे दामटले जाते.
एकमेकावर कुरघोडी करताना,
संकटात त्यांच्यामधले करार येतात.
रस्सीखेच एवढी रंगते की,
टांगा पलटी होऊन घोडे फरार होतात.
राजकीय बदमाशी करूनही सांगतात,
आम्ही किती आणि कसे नेक आहोत?
एकमेकांची परीक्षा घेऊन बोलतात,
शेवटी आम्ही सगळेच एक आहोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9200
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 फेब्रुवारी 2026

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...