Showing posts with label कैदखाना. Show all posts
Showing posts with label कैदखाना. Show all posts

Wednesday, June 9, 2021

कैदखाना

आजची वात्रटिका
---------------------

कैदखाना

जात जन्माने मिळते,
तरी लोक फुगायला लागले.
काही बंडलबाज असल्याने,
प्रमाणपत्र मागायला लागले.

कुणाचे प्रमाणपत्र वैध,
कुणाचे प्रमाणपत्र अवैध आहे!
व्यवहारीक सोयीसाठी
जो तो जाती-जातीत कैद आहे !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोद(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
चिमटा-6171
दैनिक पुण्यनगरी
9जून2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...