Showing posts with label कोरोनाच्या लाटेबरोबर. Show all posts
Showing posts with label कोरोनाच्या लाटेबरोबर. Show all posts

Monday, July 5, 2021

नवी आशा

आजची वात्रटिका
---------------------

नवी आशा

कोरोनाच्या लाटेबरोबर,
नैराश्याच्या लाटा आहेत.
सगळी कोंडी होवून,
बंद झालेल्या वांटा आहेत.

जशा लाटेला लाटा फुटतात,
तशा वाटेला वाटा फुटत असतात !
नैराश्याचे ढग फक्त,
खंबीर होइपर्यंत दाटत असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6196
दैनिक पुण्यनगरी
5जुलै2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...