Showing posts with label ज्याची त्याची चौकट. Show all posts
Showing posts with label ज्याची त्याची चौकट. Show all posts

Sunday, February 15, 2026

ज्याची त्याची चौकट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
ज्याची त्याची चौकट
बघा कुणा कुणाच्या नशिबात पाप?
कुणा कुणाच्या नशिबात पुण्य आले?
महापुरुषांना आपसात वाटून,
आज जाती जातीवाले धन्य झाले.
जशी धन्य धन्य त्यांची मानसिकता,
तशी धन्य धन्य त्यांची निष्ठा आहे.
महापुरुषांची जातीय वाटणी म्हणजे,
महापुरुषांच्या कार्याचीच चेष्टा आहे.
महापुरुषांच्याच नावावरती,
महापुरुषांच्याच विचाराला हूल आहे !
जणू स्पर्धा लागल्यासारखी,
महापुरुषांच्या नावावर नवी चूल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9190
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 फेब्रुवारी 2026

 

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अज्ञानातला आनंद एकदा भावना भडकल्या की, वास्तवाचेही भान राहत नाही. आपण निव्वळ अज्ञानी आहोत, याचेह...