Showing posts with label नामांतराची टूम. Show all posts
Showing posts with label नामांतराची टूम. Show all posts

Wednesday, July 15, 2026

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
नामांतराची टूम
कुठे नामविस्ताराचा तोडगा,
कुठे नामांतराचे खुसपट आहे.
ज्याचे दिले गेले नाव,
त्याची हकनाक घुसमट आहे.
नामांतर आणि नामविस्ताराची,
परंपरा वेळोवेळी पाळली जाते.
विस्तार आणि नामांतराची टूम,
राजकारणामध्ये घोळली जाते.
ज्याच्या त्याच्या अस्मिता,
विस्तार आणि नामांतराचे मूळ आहे !
एकाचे बघून दुसऱ्याला
विस्तार आणि नामांतराचे खुळ आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9338
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 जुलै 2026

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...