आजची वात्रटिका
---------------------
दुहेरी आनंद
नीरजची सोनेरी कमाल तर,
बजरंगाचीही धमाल आहे.
ऑलम्पिकमध्ध्ये एकाच दिवशी,
पदकांची दुहेरी कमाल आहे.
'सोनेपे सुहागा'चा अर्थ,
खऱ्या अर्थाने ध्वनित झाला!
दोन दोन ऑलिंपिक पदकांनी,
गटारीचा आनंद द्विगुणित केला!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6229
दैनिक पुण्यनगरी
8ऑगस्ट 2021
