Showing posts with label बायकांची ढगफुटी. Show all posts
Showing posts with label बायकांची ढगफुटी. Show all posts

Saturday, July 24, 2021

बायकांची ढगफुटी

आजची वात्रटिका
-----------------------

बायकांची ढगफुटी

बायकांच्या 'ढगफुटी' चा अंदाज,
नवर्‍यांना कधीसुद्धा येत नाही.
असा एकही ऋतू नसतो,
ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही.

बायकांच्या 'ढगफुटी' त,
असे काही घडून गेलेले असते.
नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन,
पार कोलमडून गेलेले असते.

गडगडाट आणि कडकडाट
ही तर 'ढगफुटी' ची थीम असते!
नवरे ज्याला 'ढगफुटी' म्हणतात,
ती तर केवळ रिमझिम असते!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6213
दैनिक पुण्यनगरी
24जुलै2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...