Showing posts with label माकड चाळे. Show all posts
Showing posts with label माकड चाळे. Show all posts

Tuesday, February 17, 2026

माकड चाळे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
माकड चाळे
टपून बसलेल्या माकडांना,
आयतेच कोलीत मिळाले जाते.
दोघांच्या भांडणांमध्ये,
सामाजिक ऐक्य जळाले जाते.
जळत्या सामाजिक ऐक्यावर,
माकडे पोळ्या भाजून घेतात.
थोडाफार पाठिंबा मिळाला की,
माकडे अजूनच माजून घेतात.
आपलीच लाल असल्याचे,
माकडांकडून टेंभे मिरवले जातात !
परस्परांचे नको ते धडे,
माकडांकडून पुन्हा गिरवले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9192
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 फेब्रुवारी 2026
----------------------------

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...