आजची वात्रटिका
------------------
मु.पो. महाराष्ट्र
काँग्रेसमध्ये वाढला कलह,
चव्हाट्यावरच कुरबुरी आहेत.
आपल्याच हातावर,
आपल्याकडूनच तुरी आहेत.
कुणी कुणाला मामा बनवतोय,
कुणाची हो हो;कुणाची ना ना आहे.
हात मोडला;गळ्यात पडला,
कुणाच्या मनगटावरच चुना आहे.
नाराजीनाम्याच्या नाट्याला,
पदवीधरची डागणी आहे!
'भारत जोडो'च्या पार्श्वभूमीवर,
काँग्रेस जोडोची मागणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6713
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
8फेब्रुवारी2023
Showing posts with label मु.पो. महाराष्ट्र...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label मु.पो. महाराष्ट्र...मराठी वात्रटिका. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
