Showing posts with label राजकीय संन्यास. Show all posts
Showing posts with label राजकीय संन्यास. Show all posts

Sunday, May 24, 2020

राजकीय संन्यास

आजची वात्रटिका
--------------------------------------
राजकीय संन्यास
एका राजकीय नेत्याने,
वेगळाच ध्यास घेतला.
बायकोला वारसदार करून,
राजकीय संन्यास घेतला.
कुणाला झाले दुःख,
कुणाला मनोमन हर्ष आहे !
राजकीय संन्यासाचा,
हा घरगुती आदर्श आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7294
दैनिक झुंजार नेता
24मे2020
-----------------------------
#कोरोना

Tuesday, December 3, 2019

राजकीय संन्यास

आजची वात्रटिका
-------------------------------------
राजकीय संन्यास
एका नेत्याने वैतागून
वैराग्याचा ध्यास घेतला.
सगळ्या गोष्टींचा उबग येताच,
त्याने राजकीय संन्यास घेतला.
राजकीय संन्यास घेवूनसुद्धा,
नेत्याने आपली वृत्ती जपली आहे !
त्याने म्हणे हिमालयातसुद्धा,
संन्याशांची पार्टी स्थापली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7137
दैनिक झुंजार नेता
3डिसेंबर2019
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...