Tuesday, December 3, 2019

राजकीय संन्यास

आजची वात्रटिका
-------------------------------------
राजकीय संन्यास
एका नेत्याने वैतागून
वैराग्याचा ध्यास घेतला.
सगळ्या गोष्टींचा उबग येताच,
त्याने राजकीय संन्यास घेतला.
राजकीय संन्यास घेवूनसुद्धा,
नेत्याने आपली वृत्ती जपली आहे !
त्याने म्हणे हिमालयातसुद्धा,
संन्याशांची पार्टी स्थापली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7137
दैनिक झुंजार नेता
3डिसेंबर2019
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का ------------------------------ गुरुत्वाकर्षण गिर्हाईकांची गर्दी बघून, वाट्टेल ते धंदे सुरु झाले....