Thursday, December 5, 2019

अकलेचे कांदे



आजची वात्रटिका
-------------------------------------
अकलेचे कांदे
पडला तरी वांधा आहे,
चढला तरी वांधा आहे.
जो डोळ्यात पाणी आणतो,
त्याचे नाव कांदा आहे.
मिसळ म्हणाली उत्तप्प्याला,
अगदीच बेचव भेळ-भत्ता आहे.
मुक्काम पोस्ट भजे,
आजकाल कोबीचा पत्ता आहे.
जे नाकाने कांदे सोलतात,
ते अकलेचे कांदे आहेत!
शेतकरी मरो,व्यापारी जगो,
असे धोरणं आणि धंदे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5646
दैनिक पुण्यनगरी
5डिसेंबर 2019
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 176 वा

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 176 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1AkxQn24HJ3lGSkc7m...