Monday, December 9, 2019

नवे संदर्भ

आजची वात्रटिका
-----------------------------------------
नवे संदर्भ
इकडून तिकडे घुसणे हाच,
राजकीय अनुभव गणला जातो.
सर्व पक्षात फिरून आलेला,
राजकीय मुत्सद्दी मानला जातो.
फोडाफोडी आणि ओढाओढी,
या सख्ख्या आणि पक्क्या आहेत !
जसा बदलला काळ,
तशा बदललेल्या व्याख्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5650
दैनिक पुण्यनगरी
9डिसेंबर 2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...