Wednesday, December 11, 2019

विद्रूप वास्तव

आजची वात्रटिका
-----------------------------------------
विद्रूप वास्तव
बलात्काऱ्यांच्या एन्काऊंटरनंतरही
बलात्कार काही थांबले नाहीत.
त्याची बोंबाबोंब करायला,
आम्ही काही बोंबले नाहीत.
बलात्काराचे हे विद्रूप वास्तव,
असह्य आणि वेदनादायी आहे !
एन्काऊंटर हा रामबाण उपाय आहे,
हा निष्कर्ष काढण्याची घाई आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7145
दैनिक झुंजार नेता
11डिसेंबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...