Saturday, December 14, 2019

सत्तेचे वरदान

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सत्तेचे वरदान
सत्ता हाती नसली की,
फार फाटाफूट होत नाही.
ओढाओढी नसल्याने,
फार ताटातूट होत नाही.
सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना
बंडाचे जास्त धोके असतात !
सत्ता लोण्याचा गोळा असेल तर,
टपलेले बोकेच बोके असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5655
दैनिक पुण्यनगरी
14डिसेंबर 2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...