Saturday, December 14, 2019

अंधा कानून

आजची वात्रटिका
-----------------------------------------
अंधा कानून
तेंव्हा खरी मजा येते,
जेंव्हा भक्त विरुद्ध भक्त असतात.
त्यांच्या सगळ्या भाव-भावना,
आंधळ्या प्रेमाने युक्त असतात.
आंधळे भक्त,आंधळी भक्ती,
आंधळेपणाचा कहर असतो !
भक्ती प्रदर्शनाची संधी मिळताच,
आंधळेपणाला बहर असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7147
दैनिक झुंजार नेता
14डिसेंबर2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...