Monday, December 2, 2019

धोरणात्मक 'तळ' टीप

आजची वात्रटिका
-------------------------------------
धोरणात्मक 'तळ' टीप
कुठल्याही राजकारणात ,
अशक्य हा शब्दच उरला नाही.
फक्त हेच बघायचे बाकी आहे,
कुणी कुणाचा हात धरला नाही?
कुणाचा म्होतूर,कुणाचा पाट,
कुणाचे 'लव्ह इन रिलेशनशिप'आहे !
'सत्तेसाठी वाट्टेल ते'
ही पक्षीय धोरणाची तळटीप आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5643
दैनिक पुण्यनगरी
2डिसेंबर 2019
------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

कोरोना युग