Wednesday, December 11, 2019

कटी पतंग

आजची वात्रटिका
-----------------------------------------
कटी पतंग
नाराजी आहे,निराशा आहे,
रुसवे आणि फुगवे आहेत.
या दारातून त्या दारात,
नाराजांचे जोगवे आहेत.
कुणाला हक्क हवा आहे,
कुणाला पुनर्वसन हवे आहे !
कुणी आपला काटा काढला,
हे ज्याचे त्याला ठावे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5652
दैनिक पुण्यनगरी
11डिसेंबर 2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...