Saturday, December 7, 2019

हैद्राबादी न्याय

आजची वात्रटिका
-------------------------------------
हैद्राबादी न्याय
बलात्कार जंगली होता,
त्याची शिक्षाही जंगली आहे.
कुणाला वाटते अयोग्य,
कुणाला वाटते चांगली आहे.
कायद्याच्या चौकटीतून
हा न्याय आला असता तर,
अधिक बरे झाले असते !
इथे कायद्याचे राज्य आहे,
हे अगदी खरे झाले असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5648
दैनिक पुण्यनगरी
7डिसेंबर 2019

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...