Tuesday, December 17, 2019

आवाज कुणाचा?

आजची वात्रटिका
-----------------------------------------
आवाज कुणाचा?
पक्षांतराच्या राजकारणाचा,
सर्वांनाच धोका आहे.
काल ज्यांचा जयजयकार,
आज त्यांच्यावरच टीका आहे.
स्तुती काय?टीका काय?
सगळेच अगदी निरस आहे !
हा आतला आवाज नाही,
तो निव्वळ कोरस आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5658
दैनिक पुण्यनगरी
17डिसेंबर 2019

No comments:

कोरोना युग