Sunday, December 29, 2019

सिस्टीम जिंदाबाद

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सिस्टीम जिंदाबाद
सिस्टीमचे झेले व्हा,
सिस्टीमचे चेले व्हा.
लुच्चे, लफंगे, लबाडांचे,
तुम्हीसुद्धा साले व्हा.
तुम्ही तिला डोक्यावर घ्या,
सिस्टीम तुम्हाला डोक्यावर घेते.
तुम्ही दलाल झालात की,
सिस्टीम तुम्हाला ठेक्यावर देते.
सिस्टीमला शेळ्या हव्यात,
तिला वाघ नको असतात !
सारखे फुस्स फुस्स करणारे,
तिला नाग नको असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7162
दैनिक झुंजार नेता
29डिसेंबर2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...