Friday, December 13, 2019

राजकीय निराधार

आजची वात्रटिका
-----------------------------------------
राजकीय निराधार
त्यांची खेळी यशस्वी,
यांचा मात्र खेळखंडोबा झाला.
कालपर्यंतचा थंडोबा,
आज मात्र बंडोबा झाला.
बंडोबा काय,थंडोबा काय?
कशालाच कसला आधार नाही !
सांगितले कोणतेही कारण,
त्यातले कोणतेच साधार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7146
दैनिक झुंजार नेता
13डिसेंबर2019

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...