Wednesday, December 18, 2019

हिंसेचा पुरस्कार

आजची वात्रटिका
-----------------------------------------
हिंसेचा पुरस्कार
काहीतरी,कुठेतरी,
नक्कीच घोळ आहे.
त्याशिवाय का देशात,
सर्वत्र जाळपोळ आहे?
लागलेल्या आगीत,
याचे त्याचे तेल आहे.
अफवा आणि वावडयांचा,
खूप मोठा सेल आहे.
अफवा आणि वावड्यांना
शांततेचा तिरस्कार आहे !
हिंस्त्र श्वापदांकडून
हिंसेचा पुरस्कार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7151
दैनिक झुंजार नेता
18डिसेंबर2019

No comments:

कोरोना युग