Monday, December 23, 2019

रडकथा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
रडकथा
राजकारण साधेसुधे उरले नाही,
आजकाल ते भलतेच कडू आहे.
जे गुंतले चक्रव्यूहात,
त्या भल्या-भल्यांना रडू आहे.
हे काही उथळ भाष्य नाही,
मोठ्या जबाबदारीचे विधान आहे!
भल्या-भल्यांचे नैराश्य बघून,
आमचे हे अचूक निदान आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5664
दैनिक पुण्यनगरी
23डिसेंबर 2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...