Friday, December 13, 2019

सत्तार्थ

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सत्तार्थ
हात धुवून घेण्यासाठी,
त्यांना वाहती गंगा लागते.
हाती सत्ता असली की,
ती सर्वांच्याच अंगा लागते.
नेते काय?कार्यकर्ते काय?
सर्वांची एकच तऱ्हा आहे !
'जिकडे सत्ता, तिकडे जत्था,'
हाच सर्वांचा नारा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5654
दैनिक पुण्यनगरी
13डिसेंबर 2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...