Showing posts with label वितंडवाद. Show all posts
Showing posts with label वितंडवाद. Show all posts

Tuesday, February 24, 2026

वितंडवाद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
वितंडवाद
वाद विनाकारण घडत नाहीत,
वाद निर्माण केले जात आहेत.
ज्यांना साधायचे आहेत डाव,
त्यांचेच वादामागे हात आहेत.
वादावरती वाद घडवून,
वितंडवाद घडवले जात आहेत.
सहानुभूतीच्या लाटेमध्ये,
वितंडवाद मढवले जात आहेत.
वादाने वाद पेटला की,
वादाचे ताण तणाव असतात !
सगळ्याच वितंडवाद्यांकडून
वादाचे मोठे बनाव असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9199
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 फेब्रुवारी 2026

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...