Showing posts with label शापित राजकारण.... साप्ताहिक वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शापित राजकारण.... साप्ताहिक वात्रटिका. Show all posts

Monday, February 9, 2026

शापित राजकारण.... साप्ताहिक वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

शापित राजकारण

जसे कुणाचे दुःख बोलके आहे, 
तसे कुणाचे दुःख मुके आहे.
विमानाच्या अपघातावरती, 
शंका कुशंकांचे दाट धुके आहे.

कुणी राजकारणासाठी तर, 
कुणी प्रेमापोटी बोलले आहेत
विमान प्रवास टाळण्याचे, 
राजकीय नेत्यांना सल्ले आहेत.

ब्लॅक बॉक्सच्या कप्प्यात, 
विमान अपघाताचे गुपित आहे !
अपघाताचेही राजकारण रंगावे,
एवढे राजकारण शापित आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 72
वर्ष- दुसरे 
7 फेब्रुवारी 2026

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अज्ञानातला आनंद एकदा भावना भडकल्या की, वास्तवाचेही भान राहत नाही. आपण निव्वळ अज्ञानी आहोत, याचेह...