Showing posts with label स्वातंत्र्याला शाप. Show all posts
Showing posts with label स्वातंत्र्याला शाप. Show all posts

Tuesday, July 20, 2021

टीपी टीपी टॅप टॅप

आजची वात्रटिका
--------------------

टीपी टीपी टॅप टॅप

ही सवय चांगली नाही,
ही सवय गदळ आहे.
संपूर्ण देशभरात,
फोन टॅपिंगचे वादळ आहे.

कानात आणि डोळ्यात,
चार बोटांचा गॅप आहे !
असे ॲप ॲप नाही,
ते स्वातंत्र्याला शाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7651
दैनिक झुंजार नेता
20जुलै2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...