Friday, July 11, 2025
दैनिक वात्रटिका l 9 आणि 10जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 39 आणि 40 स वा l पाने -63
स्वार्थ आणि अर्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
स्वार्थ आणि अर्थ
कुणाचा स्वैराराचार स्वातंत्र्य,
कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे.
ज्याच्या त्याच्या सोयीनुसार,
ज्याचा त्याचा विचार आहे.
आपल्या सोयीनुसार विचार आहे,
आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे.
जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन,
तो तर प्रत्येकाचाच स्वार्थ आहे ?
जो कालपर्यंत नालायक होता,
तोच आज अचानक नायक आहे !
आपल्या स्वार्थानुसार अर्थ लावणे,
हा दुटप्पीपणा धोकादायक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8974
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11जुलै 2025
Thursday, July 10, 2025
धोक्याचा इशारा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
धोक्याचा इशारा
जसे दांभिक गुरु आहेत,
तसे दांभिक शिष्य आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
अगदी सारखीच दृश्य आहेत.
दांभिकतेचीच पूजा आहे,
दांभिकतेची आरती आहे.
गुरु बरोबर शिष्यांच्याही,
दांभिकतेला भरती आहे.
दांभिकता आणि दिखाऊपणा,
गुरु शिष्यांच्या नात्यात आहे !
वाढत्या धार्मिक बाजारामुळे,
गुरु शिष्य परंपरा धोक्यात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8973
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10जुलै 2025
Wednesday, July 9, 2025
दैनिक वात्रटिका l 9जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 38वा l पाने -57
जागते रहो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
जागते रहो...
कुठे काय चालले आहे?
सगळ्यांना सगळे माहीत असते.
आम्हाला काय त्याचे?
हेच सर्वांकडून गृहीत असते.
सगळे काही घडून गेल्यावर,
जोरात बोंबा ठोकल्या जातात.
बैल गेल्यानंतर झोपा केल्याच्या,
गोष्टीही कळून चुकल्या जातात.
आम्ही असे म्हणत नाहीत,
अन्यायाविरुद्ध कुणी लढू नका!
जेव्हा डोळे उघडे ठेवायला हवेत,
तेव्हा डोळ्यावर कातडे ओढू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8972
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9जुलै 2025
Tuesday, July 8, 2025
दैनिक वात्रटिका l 8जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 37वा l पाने -57
पिसाळवंत....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
पिसाळवंत
इकडचे पिसळले की,
तिकडचे पिसळू लागतात.
सगळेच पिसाळलेले मग,
सुरात सूर मिसळू लागतात.
सुरात सूर मिसळले की,
संतुलन ढासळू लागतात.
नको त्याच्यात नको ते,
बेमालूम भेसळू लागतात.
अवैचारिक भेसळ मग,
विचार म्हणून लादली जाते !
झुंडशाहीच्या जोरावरती,
नेमकी संधी साधली जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8971
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8जुलै 2025
Monday, July 7, 2025
दैनिक वात्रटिका l 7जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 36वा l पाने -57
निमित्ताला कारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Sunday, July 6, 2025
मराठी विजय मेळावा.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 5जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 35वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 5जुलै 2025
वर्ष- पाचवे
अंक - 35वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1b2Fnoc2G3tSoG9s00_X9nc1Z-z-aFh2i/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 107
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
हिंदीचे उपकार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
हिंदीचे उपकार
भाषा माणसे तोडू शकते,
भाषा माणसे जोडू शकते.
दुरावलेली रक्ताची नाती,
भाषाच जवळ ओढू शकते.
भाषेमुळे त्रागा होऊ शकतो,
भाषा एक धागा होऊ शकतो.
दुरावलेल्या भावामधला,
बंधुभाव जागा होऊ शकतो.
शेवटी भाषाच भाषेचे,
खरे महत्व जाणू शकते !
म्हणूनच आज मराठी भाषा,
हिंदीचेही आभार मानू शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8969
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6जुलै 2025
Saturday, July 5, 2025
दैनिक वात्रटिका l 4जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 34वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 4जुलै 2025
वर्ष- पाचवे
अंक - 34वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1aaUV53FsIEFizOQJb2Nx2PHpIdQUvt8f/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 106
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
राखीव मुद्दे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
राखीव मुद्दे
राखून ठेवलेला मुद्दा,
सोयीनुसार उबवला जातो.
आपापला राजकीय अजेंडा,
सोयीनुसार राबवला जातो.
राखून ठेवलेला मुद्दा,
हा राजकीय ठेवा असतो.
लोकहितासाठी सर्वकाही,
हा राजकीय दावा असतो.
असे हातचे मुद्दे राखण्यात,
तसे कुणीच मागे नाहीत !
त्यांचा गैरसमज पक्का होतो,
लोक अजून जागे नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8968
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5जुलै 2025
Friday, July 4, 2025
हात चलाखी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.
-------------------
हात चलाखी
कुणी कुणाचा उजवा तर,
कुणी कुणाचा डावा हात असतो.
एकदा हाताबाहेर गेले की,
त्यांच्याकडूनच त्यांचा घात असतो.
कधी डावे हात उजवे होतात,
कधी उजवे हातही डावे होतात.
हातांच्या हातच्यालाखीमुळेच,
राजकीय दावे प्रतिदावे होतात.
डावे उजवे हाताबाहेर गेले की,
सगळ्याच गोष्टी नडू लागतात !
आपलेच हात मोडून मग,
आपल्याच गळ्यात पडू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8967
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4जुलै 2025
Thursday, July 3, 2025
दैनिक वात्रटिका l 3जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 33वा l पाने -57
पाऊले चालती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
पाऊले चालती...
पंढरीच्या वारीत नक्षलवादी घुसले,
हे गृहीत धरून टाकले आहे.
एकाच फटक्यात अनेकांना,
नक्षलवादी करून टाकले आहे.
वारीत घुसलेल्या नक्षलवाद्यांची,
म्हणे ही अर्बन कॉपी आहे.
कर्मठ आणि सनातनी विचारांची
ही तर चक्क कार्बन कॉपी आहे.
हे काही शास्त्रीय संशोधन नाही,
हा तर आधुनिक जावई शोध आहे !
जीभ उचलून टाळ्याला लावू नये,
एवढाच यातला खरा बोध आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8966
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3जुलै 2025
Wednesday, July 2, 2025
दैनिक वात्रटिका l 2जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 32वा l पाने -57

वाढदिवस शुभेच्छा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
वाढदिवस शुभेच्छा
हे लावतात डिजिटल बॅनर,
त्यांचा फक्त एखादा फोन येतो.
सांगा असल्या शुभेच्छा,
नेमका कुणाला कोण देतो?
कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला,
त्यांच्या नेत्यांचे गोडवे असतात.
लाळघोटे आणि पायचाटे तरी,
बॅनरवरती मात्र कडवे असतात.
बळचं शुभेच्छा घेतल्या जातात,
असे नाही की त्या दिल्या जातात !
अशा बळजबरीच्या शुभेच्छाच,
मीडियावर व्हायरल केल्या जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8965
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2जुलै 2025
Tuesday, July 1, 2025
दैनिक वात्रटिका l 1 जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 31वा l पाने -57
मावशीचे अतिक्रमण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
मावशीचे अतिक्रमण
माय मरो,मावशी जगो,
ही तर निव्वळ थाप आहे.
जो असा विचार करतो,
तो मी आणि माझा बाप आहे.
बापाची ती मेहुणी,
लेकरांची ती मावशी आहे.
जेवढी हौशी आणि नवशी,
तेवढीच ती गवशी आहे.
साली तो आधी घरवाली,
म्हणूनच वातावरण तंग आहे !
तरी संयमाच्या भूमिकेत,
अजूनही मदर टंग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8964
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 जुलै 2025
महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...


















