Wednesday, July 9, 2025

जागते रहो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

जागते रहो...

कुठे काय चालले आहे?
सगळ्यांना सगळे माहीत असते.
आम्हाला काय त्याचे?
हेच सर्वांकडून गृहीत असते.

सगळे काही घडून गेल्यावर,
जोरात बोंबा ठोकल्या जातात.
बैल गेल्यानंतर झोपा केल्याच्या,
गोष्टीही कळून चुकल्या जातात.

आम्ही असे म्हणत नाहीत,
अन्यायाविरुद्ध कुणी लढू नका!
जेव्हा डोळे उघडे ठेवायला हवेत,
तेव्हा डोळ्यावर कातडे ओढू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8972
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...