Thursday, July 17, 2025

देव दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

देव दर्शन

कुणाला स्वतः देव दिसू लागला,
कुणाला दुसऱ्यात देव दिसू लागले.
भक्तांची आंधळी भक्ती बघून,
सगळेच्या सगळे देव हसू लागले.

ज्याला ज्याला पाहिजे मोका,
त्याच्यासाठी आयताच मोका आहे.
देव देवांना म्हणू लागले,
आपल्या अस्तित्वालाच धोका आहे.

तेहतीस कोटी देवांची,
जणू कोटीवर मिश्किल कोटी आहे !
प्रत्यक्ष देवही समजू शकतात,
हे सगळे निष्ठा दर्शनापोटी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-8979
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जुलै 2025
 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...