
साप्ताहिक वात्रटिका
-----------------------------
बदनामीचे वारे
जसे बदनामीचे राजकारण आहे
तसे बदनामीचे दावे आहेत.
बदनामीचे भूत जागृत झाले,
राजकीय बदनामीचे कावे आहेत.
कुणी बदनाम करतो आहे,
कुणी स्वतःच बदनाम होतो आहे.
ज्याला त्याला प्रत्येकालाच,
आज बदनामीचा संशय येतो आहे.
दुसऱ्याची प्रतिमा बदनाम करताना,
आपली प्रतिमा बिंबवली पाहिजे !
लोकशाहीची बदनामी मात्र,
सगळ्यांनी मिळून थांबवली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------;
साप्ताहिक सरकारनामा
19 जुलै 2025
No comments:
Post a Comment