साप्ताहिक
वात्रटिका
-----------------------------
मोबाईल गेम
प्रगतीचा आलेख 'फ्लॅट' नाही,
जादा गम,थोडी खुशी आहे.
वादग्रस्ततेचा सुकाळ तरी,
त्यांच्याच पदरामध्ये कृषी आहे.
पंचनामा करण्याची वेळ आली,
तेव्हा तर हातामध्ये ढेकूळ आहे.
ओसाड गावचा पाटील,
हल्ली जास्तच व्याकुळ आहे.
कडी वर कडी झाली
प्रकार तर सेम टू सेम केला !
ऑनलाइन रमी खेळताना,
चक्क मोबाईलनेच गेम केला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
साप्ताहिक सरकारनामा
26 जुलै 2025
No comments:
Post a Comment