साप्ताहिक
वात्रटिका
-----------------------
संधीचे नवनिर्माण
पहिलीपासूनचा हिंदी विषय,
सोयीस्करपणे विसरले आहेत.
आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे,
परप्रांतीयावरती घसरले आहेत.
निवडणुकीच्या राजकारणाला,
प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे.
ज्यांना हवी आहे त्यांना,
परप्रांतीयांकडूनही संधी आहे.
आपल्या पारंपरिक संधीचे,
पुन्हा एकदा नवनिर्माण आहे !
आपटून मारून;ठोकून काढू,
परस्पर विरोधी फर्मान आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा
12 जुलै 2025
No comments:
Post a Comment