Tuesday, July 22, 2025

सारेच डेंजर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सारेच डेंजर

इतरांचे गळे दाबताना,
त्यांना मात्र कंठ फुटला जातो.
इथे म्हणे लोकशाहीचा,
रोजच्या रोज गळा घोटला जातो.

लोकशाहीचा गळा घोटून,
म्हणे लोकशाहीची हत्या आहे.
नक्कीच कुणीतरी आहे खरे,
नक्कीच कुणीतरी मिथ्या आहे.

लोकशाही धोक्यात असल्याचे,
सगळीकडून नारे उठले जातात !
लोकशाही बचावचे डांगोरे,
सगळ्या बाजूने पिटले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-8984
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22जुलै 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...