Sunday, July 13, 2025

राष्ट्रपुरुषांची बदनामी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------

राष्ट्रपुरुषांची बदनामी

सगळ्याच अंधभक्तांकडून,
हे प्रकार खुले आम केले जातात.
राष्ट्रपुरुषांची वाटणी करून,
राष्ट्रपुरुष बदनाम केले जातात.

राष्ट्रपुरुष विरुद्ध राष्ट्रपुरुष,
अशीच जोड लावली जाते.
कोण छोटा आहे? कोण मोठा आहे?
याची चढाओढ लावली जाते.

अंध भक्तांच्या चढओढीमध्ये,
फक्त राष्ट्रपुरुषच हारले जातात !
राष्ट्रपुरुष अमर असले तरी,
ते पुन्हा पुन्हा मारले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8976
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13जुलै 2025

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...