Thursday, July 31, 2025

नंबर गेम.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नंबर गेम

एकाला गप्प करण्यासाठी,
दुसऱ्याला भडकवले जाते.
तिसऱ्याला वाचवण्यासाठी,
चौथ्याला अडकवले जाते.

पाचव्याची ढाल करून,
सहाव्याला सटकवले जाते.
साडेसाती मागे लावून,
मूळ मुद्द्याला भटकवले जाते.

जे जे खेळतात नंबर गेम,
ते ते सगळेच नंबरी असतात !
त्यांचे इरादे काळेबेरे,
त्यांची मनेही डांबरी असतात!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8993
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...