Wednesday, July 23, 2025

मुद्देसूद विचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
मुद्देसूद विचार
मुद्दे जुनेच असले तरी,
कायमस्वरूपी पुरवले जातात.
नवा नवा मसाला घालून,
जुनेच मुद्दे मुरवले जातात.
जुनेच मुद्दे मुरवले की,
राजकारणाची लज्जत वाढते.
प्रतिष्ठा पणाला लावली की,
मुद्द्यांचीसुद्धा इज्जत वाढते.
जुनेच मुद्दे उजवले तरी,
नव्या मुद्द्यांनाही कमी नसते !
जुने ते सोने असल्यामुळे,
नव्यांची मात्र काही हमी नसते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8985
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23जुलै 2025

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...