Friday, July 25, 2025

उचका उचकी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

उचका उचकी

त्यांनी दचकायचे सोडून,
लोकच दचकायला लागले.
एकमेकांचे उकांडे,
जाहीर उचकायला लागले.

परस्परांच्या उकांड्यावरती,
त्यांची जाहीर लोळण आहे.
आता काय बाहेर येणार?
लोकांची भीतीने गाळण आहे.

एकमेकांचे उकांडे उचकताना,
परस्परांच्या तोंडाला फेस आहे !
कुणीही कुणाचे उचकले तरी,
सगळ्यांची सारखीच केस आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8987
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25जुलै 2025
 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...