आजची वात्रटिका
-------------------
निमित्ताला कारण
हो नाही म्हणता म्हणता,
उशिरा का होईना ते एक झाले.
कुणाची झाली पंचायत,
कुणासाठी मात्र ठीक झाले.
कुणाचे पुण्य फळाला यायचे तर,
इथे पाप फळाला आले आहे.
त्रिभाषा सक्तीचे जुनेच धोरण,
निमित्ताला कारण झाले आहे.
कुणासाठी मराठी माणसाचे,
कुणासाठी कौटुंबिक ऐक्य आहे !
सगळ्यापेक्षा महाराष्ट्र मोठा,
हेच नवे ब्रीदवाक्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8970
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7जुलै 2025

No comments:
Post a Comment