Sunday, July 27, 2025

भाटगिरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

भाटगिरी

जिकडे बघावे तिकडे, 
हल्ली भाट वाढले आहेत.
भटगिरीचा किळस तरी,
त्यांचेच थाट वाढले आहेत.

भाटांचाच वाढला माज,
तरीही तो माज वाटत नाही. 
भाटांना आपल्या भाटगिरीची,
थोडीही लाज वाटत नाही.

पॅकेज नावाच्या खुराकावर, 
आज भाट पोसलेले आहेत !
सगळ्याच मिडिया मध्ये,
आज भाट बसलेले आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8988
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26जुलै 2025
-------------------------------

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...