आजची वात्रटिका
-------------------
सहजीवन
गुन्हेगारी की राजकारण?
सांगा कोण जास्त डर्टी आहे?
गुन्हेगारांनी व्यापलेली,
प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे.
कुणाकडे थोडी कमी आहे,
कुणाकडे थोडी जादा आहे.
पक्षात या आणि पवित्र व्हा..
प्रत्येक पार्टीचा वादा आहे.
हात दाखवून अवलक्षण,
म्हणून फारसे कुणी बोलत नाही !
गुंडा पुंडांच्या आशीर्वादाशिवाय,
जणू पार्टीचे पान हालत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8981
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जुलै 2025

No comments:
Post a Comment