Wednesday, July 30, 2025

सिंदूरचे ऑपरेशन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सिंदूरचे ऑपरेशन

भारतीय सैनिकांच्या शौर्याला,
जरी सर्वांकडूनच वंदन झाले.
तरीही ऑपरेशन सिंदूर वरून,
संसदेमध्ये रणकंदन झाले.

सरकारच्या रणनीतीवर,
विरोधकांकडून शंका आहे.
आपल्या सामर्थ्य आणि शौर्याचा,
सरकारकडूनही डंका आहे.

विरोधक आणि सरकारने,
आपापले काम केले आहे !
ट्रम्प तात्याचे नोबेल मात्र,
हकनाक धोक्यात आले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8992
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30जुलै 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...